मराठी न्युज डिजीटल/प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडच्या केज तालुक्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील चुलत चुलत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या कृत्यामुळे बसलेला मानसिक धक्का सहन न झाल्यानं पीडितेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं आहे. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
असा घडला होता प्रकार
पीडित मुलगी ही १०वीत शिकत होती. दोन दिवसांपूर्वी ती आपल्या घराच्या पाठीमागील गोठ्यातून काम आटोपून घराकडे परतत असताना नराधम चुलत चुलत्याने तिचा रस्ता अडवला. तिला बळजबरीने बाजेवर पाडून तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना उघड करू नये यासाठी आरोपी आणि त्याच्या पत्नीने पीडितेवर दबाव टाकला. ‘काही सांगितल्यास जिवंत मारून टाकू,’ अशी धमकी या दाम्पत्याने पीडितेला दिली होतीमानसिक धक्क्यातून टोकाचं पाऊल
ज्या नात्यावर विश्वास ठेवायचा, त्याच रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने इतके घाण कृत्य केल्यानं पीडित मुलगी पूर्णपणे खचून गेली होती. आपल्याच घरात आपण सुरक्षित नसल्याची जाणीव आणि झालेला अपमान तिला सहन झाला नाही. या मानसिक त्रासातून तिने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने केज येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास सोडला
मुख्य आरोपी केला अटक, पत्नी फरारघटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी केज ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार, धमकी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा चुलत चुलता आणि त्याची पत्नी या दोघांनाही आरोपी करण्यात आलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला तत्काळ ताब्यात घेतलं असून, त्याच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत
आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणीया घटनेनंतर बीड जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गावात शोककळा पसरली असून, आरोपींना कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. एका कोवळ्या जीवाला अशा प्रकारे क्रूरतेचा बळी पडावं लागल्यानं समाजाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे