पाटोदा (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका सध्या भुरट्या चोरट्यांच्या विळख्यात अडकला आहे. दररोज होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे तालुक्यातील जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मोबाइल, दुचाकी, दुकानातील रोकड, शेती साहित्य यांची चोरी झपाट्याने वाढत असताना, पोलिस प्रशासन हतबल होत आहे.
तालुक्यातील नागरिक म्हणतात, “रोज सकाळी कुठे तरी चोरी झाली असते. पोलिसांचं काम फक्त एफआयआर नोंदवणं आणि ‘तपास सुरू आहे’ असं सांगणं झालंय का?” या प्रश्नांनी नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाटोदा शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये भुरट्या चोरीच्या घटनांचा सत्र सुरू आहे. तरीही एकाही चोरट्याचा ठोस ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
राजकीय नेतृत्वाचा दु:श्चिंत मौन
तालुक्यातील चोरीच्या वाढत्या घटनांवर अजूनही कोणतेही राजकीय नेते उघडपणे बोलताना दिसत नाहीत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही नेत्यांचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
नागरिकांची मागणी
- गावागावात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करावे.
- पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय व्हावी.
- चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाई होऊ द्यावी.









