---Advertisement---

गावगाड्यांच्या मालमत्तांची माहिती आता ऑनलाईन

On: June 24, 2025 3:52 AM
Follow Us:
ग्रामपंचायत मालमत्ता ऑनलाईन
---Advertisement---

ठाणे | मराठी News.in प्रतिनिधी
ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘डिजिटल ग्रामशासन’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींच्या स्थावर व जंगम मालमत्तांची संगणकीकृत नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार असून, गावांची मालमत्ता आता ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहे.

जिल्ह्यातील एकूण ९ हजार ४७७ मालमत्तांची माहिती अद्ययावत करून zpthanemalmattakosh.com या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. यात ग्रामपंचायतींच्या इमारती, मोकळी जमीन, भूखंड, तसेच वाहने व जंगम मालमत्ता यांचा समावेश आहे.

डिजिटल ग्रामशासनामुळे पारदर्शकतेला चालना

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले, “मालमत्तांची अचूक माहिती ही स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेची गुरुकिल्ली आहे. मालमत्तेच्या संरक्षण, देखभाल, नियोजन आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.”

अंतिम टप्प्यात काम

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी माहिती दिली की, “मालमत्तेची अद्ययावत माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे ग्रामपंचायतींचे संपत्ती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment