---Advertisement---

“आज साहेब असते तर देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेत असते” – पंकजा मुंडे यांचे भावनिक वक्तव्य

On: June 3, 2025 9:34 AM
Follow Us:
"पंकजा मुंडेंचं भावनिक वक्तव्य: ‘आज साहेब असते तर देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेत असते’ – गोपीनाथगड स्मृतिदिन 2025"
---Advertisement---

गोपीनाथगड (३ जून):
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांच्या कन्या, मंत्री पंकजा मुंडे भावनिक झाल्या. “रामटेक बंगला भेटल्यावर मला पारितोषिक मिळाल्यासारखं वाटलं होतं. तो बंगला माझ्यासाठी खूप काही आहे,” असे त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आजचा दिवस आमच्यासाठी सर्व काही उध्वस्त करणारा होता. त्यांची मुलगी म्हणून हा कार्यक्रम घेणे हे माझे कर्तव्य आहे.” या कार्यक्रमात रक्तदान शिबिर, पशुसंवर्धन स्टॉल, आरोग्य तपासणी शिबिर अशा उपक्रमांचाही समावेश होता. पावसामुळे कार्यक्रमाचे स्वरूप साधे ठेवण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले, “आज साहेब असते तर ते देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेत असते. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. मी जी भूमिका पार पाडते आहे, ती साहेबांच्या शिकवणीमुळेच शक्य होत आहे.”

विशेष बाब म्हणजे यंदा धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार असल्याने ११ वर्षांनंतर गोपीनाथ गडावर मुंडे बंधू-भगिनी एकत्र दिसणार असल्याचे पाहायला मिळाले. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं की, “वाईट काळातून मी शिकत गेले, आज मी पुढे चालत आहे. मुंडे साहेब हे वंचितांचे वाली बनावं, असे स्वप्न पाहायचे, आणि त्यांच्या योजनांना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आज सुरू आहे.”

यावेळी ऊसतोड कामगारांच्या मानधन वाढीसंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, “मला या बाबत माहिती नाही.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment