---Advertisement---

गृहोद्योगाच्या नावाखाली 1634 महिलांची 42 लाखांची फसवणूक; कोळेकर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

On: June 1, 2025 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे | प्रतिनिधी
गृहोद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून तब्बल १६३४ महिलांकडून सुमारे ४२ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर व जयश्री हंगरगे-कोळेकर (रा. भेकराईनगर, हडपसर) या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ज्योती उत्तम बोरावके (वय ५२, रा. ससाणेनगर) यांनी तक्रार दिली असून, हा प्रकार ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.


कोळेकर दाम्पत्याने ‘खुशी महिला गृहोद्योग समूह’ या नावाने भेकराईनगर परिसरात एक बनावट संस्था सुरू केली. पेन्सिल पॅकिंग आणि गृहोपयोगी वस्तू तयार करण्याच्या उद्योगात महिलांना रोजगार दिला जाईल, असे सांगत त्यांनी महिला गटांमध्ये विश्वास निर्माण केला.

व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांनी गृहोद्योग समूहाचे सभासद व्हावे लागेल आणि त्यासाठी प्रत्येकी २०५० रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यानंतर महिलांना रोज २०० रुपये मानधन, आठवड्यातून पाच दिवस काम दिले जाईल, असे आमिष दाखवण्यात आले.


फिर्यादी बोरावके यांच्यासह अन्य चार महिलांची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या शाखाप्रमुखांमार्फत महिलांकडून पैसे गोळा करण्यात आले. एकूण १६३४ महिलांकडून ४२,७९,७०० रुपये जमा करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम न देता संशयितांनी महिलांची फसवणूक केली आणि ते फरार झाले.


काम सुरू झाले नाही आणि महिलांना मोबदला न मिळाल्यामुळे महिलांनी शाखाप्रमुखांकडे तगादा लावला. त्यानंतर बोरावके यांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक देशमुख पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पुणे विमानतळावर खळबळ : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि काडतुसे; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

नवऱ्याच्या रागामुळे बायकोचा ठोसा लागून मृत्यू; बुडागुम्पर डोड्डी गाव हादरले

महादेव मुंडे खून प्रकरणात थरारक गौप्यस्फोट; “हाडं, कातडं टेबलावर ठेवली होती”, बाळा बांगरांचा आरोप, पत्नी ज्ञानेश्वरींची भावनिक प्रतिक्रिया

सासऱ्याला हार्ट अटॅक, पण जावयाने केला 'गेम'! डॉक्टर मुलीच्या सतर्कतेने उघड झाला खुनाचा कट

सासऱ्याला हार्ट अटॅक, पण जावयाने केला ‘गेम’! डॉक्टर मुलीच्या सतर्कतेने उघड झाला खुनाचा कट

सोनम रघुवंशी सापडली; पती राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणात धक्कादायक खुलासा

सोनम रघुवंशी सापडली; पती राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणात धक्कादायक खुलासा

शेतीच्या वादातून तरुणाची आत्महत्या; जळगाव हादरलं

“भावाला फोन, मित्रांना मेसेज, खिशात चिठ्ठी ठेवून तरुणाची आत्महत्या; शेतीच्या वादातून शिदवाडीत हृदयद्रावक घटना”

Leave a Comment